Skip to main content

रेफरल एफएक्यू

Last updated: 12th March 2021

मोज रेफरल प्रोग्राम काय आहे?

मोज रेफरल प्रोग्राम एक युजर आमंत्रण प्रोग्राम आहे, ज्याला वापरून मोजचे युजर्स मोज अॅपमध्ये त्यांच्या मित्रमंडळीला आणि कुटुंबियांना आमंत्रित करत पैसे कमवू शकतात.

मोज रेफरल प्रोग्राम वापरून पैसे कसे कमवायचे?

रिवार्ड्स 2 टप्प्यांमध्ये दिले जातात. टप्पा 1 जेव्हा एक निमंत्रित रेफरल लिंक वापरून इंस्टॉल करत एक खाते उघडतो. टप्पा 2 जेव्हा एक निमंत्रित मोज अॅपवर 30 मिनिटांचे वाच टाईम पूर्ण करतो.

टप्पा 1 चे रिवार्ड्स मला कसे मिळतील?

टप्पा 1 मध्ये, जेव्हा वैध निमंत्रित त्याच्या खात्याची पडताळणी करतात, तेव्हा रेफरर आणि निमंत्रित दोघांनाही रिवार्ड मिळते.

टप्पा 2 चे रिवार्ड्स मला कसे मिळतील?

टप्पा 2 मध्ये, जेव्हा एक वैध निमंत्रित, ज्याला टप्पा 1 मध्ये रिवार्ड मिळालेले आहे, त्याने हे अॅप इंस्टाल केल्याच्या 7 दिवसांमध्ये 30 मिनिटांचे वाच टाईम पूर्ण केल्यास, रेफरर आणि निमंत्रित दोघानांही रिवार्ड मिळेल.

मी कमावलेले रिवार्ड्सचे विमोचन मी कसे करावे?

कमावलेले रिवार्ड्सचे विमोचन करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्याचे तपशील जोडावे लागतील. भविष्यात आम्ही विमोचनासाठी आणखी मार्ग जोडणार आहोत.

माझे मित्र त्यांच्या फोनवर रिवार्ड्स प्रोग्राम पहात नाहीत. का?

मोज रेफरल प्रोग्राम फक्त पात्र युजर्सच्या एका संचासाठी खुला आहे. तसेच, हा प्रोग्राम फक्त मोज अँड्रॉइड अॅपवर उपलब्ध केलेला आहे.

मी एका मित्राला रेफर केले आणि त्याने फेसबुक वापरून त्याच्या खात्याची पडताळणी केली आहे, पण मला अजून कोणतेही रिवार्ड मिळालेले नाही. का?

निमंत्रिताला रिवार्ड्ससाठी पात्र होण्यासाठी फोन नंबर किंवा ट्रूकॉलर वापरून त्यांच्या खात्यांची पडताळणी केली पाहिजे.

मी एका मित्राला रेफर केले आणि त्याने त्याच्या खात्याची पडताळणी केली आहे, पण मला अजून कोणतेही 2 ऱ्या टप्प्याचे रिवार्ड मिळालेले नाही. का?

निमंत्रिताने 2 ऱ्या टप्प्याच्या रिवार्डसाठी हे अॅप इंस्टॉल केल्याच्या 7 दिवसांमध्ये 30 मिनिटांचे वाच टाईम पूर्ण केले पाहिजे.

पॅरॅलल स्पेससारखे अॅप्स मी वापरू शकतो का?

नाही. क्लोन अॅप्स, इम्युलेटर्स आणि रूटेड उपकरणे रिवार्ड्स प्रोग्रामसाठी पात्र नाहीत. अशा अॅप्सच्या वापरांसाठी तुम्हाला आयुष्यभरासाठी प्रतिबंधित केले जाऊ शकते.

मोज रेफरल प्रोग्राम नियम आणि मार्गदर्शक सूचना#

मोज रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होण्यापूर्वी कृपया खालील नियम वाचा. सहभागी होत, तुम्ही पुष्टी करता की तुम्ही खाली उल्लेखित सर्व नियम वाचले आहेत आणि त्यांना स्वीकृती दिली आहे.

 1. दोन टप्प्यांमध्ये मोज रेफरल प्रोग्राम रिवार्ड्स युजर्स:
  • टप्पा 1 रिवार्ड: जेव्हापण एक रेफरर यशस्वीपणे एका नव्या युजरला (निमंत्रित) आमंत्रित करतो आणि निमंत्रित एक खाते निर्माण करतो, तेव्हा रेफरर आणि निमंत्रित दोघांना प्रत्येकी रु. 2 मिळतात.
  • टप्पा 2 रिवार्ड: जेव्हा एक निमंत्रित, ज्याला टप्पा 1 रिवार्ड मिळाले आहे, त्याने हे अॅप इंस्टॉल करण्याच्या पहिल्या 7 दिवसांच्या आत फॉर यू फीड वर 30 मिनिटांचे व्हिडियोज यशस्वीपणे पाहिले, की रेफर आणि निमंत्रित दोघांना प्रत्येकी रु. 5 मिळतील.
 2. एक ‘नवा युजर’ याचा अर्थ एक निमंत्रित जो पहिल्यांदा आपल्या उपकरणावर मोज अॅप डाउनलोड करत असतो.
 3. एक ‘यशस्वी रेफरल’ तेव्हा होते, जेव्हा एक नवा युजर रेफरल लिंक वापरून मोज अॅप डाउनलोड करतो आणि त्या अॅपवर एक खाते निर्माण करतो.
 4. मर्यादा: या प्रोग्रामदरम्यान, प्रत्येक युजर जास्तीत जास्त 10 युजर्सना आमंत्रित करू शकतो.
 5. जेव्हा एक निमंत्रित यशस्वीपणे अॅप इंस्टॉल करतो आणि लॉग इन करतो, तेव्हा तोच युजर पुनः-आमंत्रणासाठी उपयोज्य नसतो. आपण नवे युजर्स नोंदणीकृत फोन नंबर्स, उपकरणाची माहिती आणि इतर युजरशी संबंधित माहितीनुसार ओळखतो.
 6. विमोचन
  • एक युजर त्याच्या प्रोफाईलला केवळ एक बँकेचे खाते जोडू शकतो.
  • एकदा एखाद्या युजरने एका बँकेच्या खात्यात त्याच्या रिवार्डचे विमोचन केले, की मग तेच बँकेचे खाते अन्य कोणत्याही युजरद्वारा वापरले जाऊ शकत नाही.
  • तुमच्या रिवार्डचे विमोचन करण्यापूर्वी, कृपया तुमच्या बँकेच्या खात्याच्या तपशिलांची पुष्टी करा. चुकीचे बँकेचे तपशील पुरवल्यास त्यासाठी मोज जबाबदार नसेल.
 7. अपात्रतेसाठी निकष:
  • रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी आभासी फोन नंबर्सना परवानगी दिली जाणार नाही.
  • अॅपच्या क्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी इम्युलेटर्ससारख्या त्रयस्थ पक्षाच्या टूल्सच्या वापरावर काटेकोर प्रतिबंध आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर संशयास्पद फसवणुकीच्या क्रिया करत असलेल्या युजर्सवर प्रतिबंद आणण्याचा मोज अॅपकडे हक्क आरक्षित आहे.
 8. मोज रेफरल प्रोग्राम केवळ मोज अँड्रॉइड अॅपवर उपलब्ध आहे. मोज आयओएस अॅप आणि मोज लाईट अॅपवरील इंस्टॉल्स रेफरल रिवार्ड्ससाठी पात्र असणार नाहीत.

मोज अॅपच्या अटी आणि गोपनीयता आणि सामुदायिक सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वे देखील या प्रसंगासाठी लागू आहेत

अधिक माहितीसाठी, कृपया मोज रेफरल प्रोग्राम अटी आणि शर्तीआणि एफएक्यूचा संदर्भ घ्या