Skip to main content

रेफरल प्रोग्रामच्या अटी आणि शर्ती

Last updated: 12th March 2021

मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारा ("आम्ही", "एमटीपीएल", "आम्हाला") प्रस्तुत करण्यात आलेला मोज रेफरल प्रोग्राम ("प्रोग्राम") तुम्हाला ("तुम्ही", "रेफरर") मोजमध्ये ("प्लॅटफॉर्म") सामील होण्यासाठी तुमच्या मित्रमंडळीला, सहयोग्यांना आणि कुटुंबियांना ("रेफर्ड", "सहभागी") रेफर करण्यासाठी शिफारस करण्यासाठी रिवार्ड देण्यासाठी बनवला आहे.

या प्रोग्रामच्या अटी आणि शर्ती ("अटी") तुम्ही आणि एमटीपीएलदरम्यान एक बांधील करार आहे आणि तो कोणत्याही आणि सर्व प्रोग्रामच्या प्रस्तुतींमध्ये तुमच्या सहभागास संचालित करेल. या प्रोग्राममध्ये सहभागी होत तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या अटी आणि शर्ती, आणि गोपनीयता धोरणास स्वीकृती देता. तुम्ही या प्रोग्रामच्या अटी आणि शर्ती, आणि गोपनीयता धोरणास त्यांच्या समग्रतेत स्वीकृती देत नसल्यास, तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यास अधिकृत नसाल. एमटीपीएल आपल्या विवेकपूर्ण निर्णयात कोणत्याही नोटीसविना या प्रोग्रामचा कोणताही भाग किंवा पूर्णपणे बदलण्याचे, रद्द करण्याचे, लांबणीवर टाकण्याचे, किंवा सुधारण्याचे हक्क राखते. एमटीपीएल या प्रोग्राममध्ये कोणत्याही युजरला किंवा संभावित युजरला कोणत्याही वेळी सहभागातून अपात्र ठरवण्याचा हक्क राखते.

पात्रता:#

 • या प्रोग्राममध्ये सहभागासाठी पात्र होण्यासाठी दोन्ही रेफरर या प्लॅटफॉर्मचे रजिस्टर्ड युजर असले पाहिजे.
 • या प्रोग्राममधील सहभाग फक्त या प्लॅटफॉर्मच्या अशा रजिस्टर्ड युजर्ससाठी उपलब्ध आहे, ज्यांना इन-अॅप बॅनरद्वारा प्लॅटफॉर्ममधून पत्रव्यवहार मिळेल.

क्वालिफाइड रेफरल:#

एक "क्वालिफाइड रेफरल" याचा अर्थ खालील सर्व अटी भागवल्या आहेत:

 • रेफर्ड रेफरल लिंकचा वापर करत प्लॅटफॉर्मवर सामील होतात.
 • अन्य कोणतीही पद्धत वापरून रेफर्ड प्लॅटफॉर्मवर सामील झाला, तर नोंदणीला क्वालिफाइड रेफरल म्हणून समजले जाणार नाही आणि रेफरर कोणत्याही रिवार्डसाठी पात्र ठरणार नाही.
 • रेफर्डची या प्लॅटफॉर्मचा युजर म्हणून अगोदर नोंदणी झालेली नसेल.
 • प्रत्येक रेफर्डसाठी फक्त एक क्वालिफाइड रेफरल कमावले जाऊ शकते, प्रत्येक रेफररमागे जास्तीत जास्त 10 क्वालिफाइड रेफरल्स. कोणत्याही अतिरिक्त किंवा पुढील रेफर्डना क्वालिफाइड रेफरल्स म्हणून विचारात घेतले जाणार नाही आणि त्यामुळे रिवार्ड्ससाठी हक्कदार ठरत नाही.

रिवार्ड्स:#

 • रेफरर रिवार्डसाठी पात्र असलेली रक्कम असेल रु. रेफरल लिंक वापरून प्लॅटफॉर्मवर सामील झाल्याबद्दल प्रत्येक क्वालिफाइड रेफरलला __ (रु. __) ("रिवार्ड"). रेफररला अटींच्या अनुषंगाने आणि अनुपालनाच्या अधीन राहून रिवार्ड दिला जाईल. रेफररने या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या रेफररच्या बँकेच्या खात्यामध्ये रिवार्ड जमा केला जाईल.
 • रिवार्ड्स पडताळणीच्या अधीन आहेत. एमटीपीएल चौकशीच्या हेतूसाठी रिवार्ड देण्यात विलंब करू शकते. एमटीपीएल, त्याच्या विवेकपूर्ण निर्णयात त्याला ते लबाडीचे, संशयास्पद, अटींचे उल्लंघन करणारे वाटल्यास किंवा असे मानत असेल की यामुळे एमटीपीएल, त्याच्या अनुषंगी कंपन्या, संलग्न कंपन्या किंवा अन्य कोणतेही संबंधित अधिकारी, संचालक, कर्मचारी, प्रतिनिधी आणि एजंट्स यांच्यावर संभावित दायित्त्व लादले जाईल, तर ते अशा कोणत्याही व्यवहाराची पडताळणी करण्यास किंवा प्रक्रिया करण्यास नकार देखील देऊ शकतात. एमटीपीएल सर्व निर्णय अंतिम आणि बांधील असतील, ज्यात क्वालिफाइड रेफरल किंवा रिवार्डची पडताळणी झालेली आहे का हा देखील निर्णय असेल.

डेटाची गोपनीयता:#

 • रेफरर स्वीकारतो की एमटीपीएल या प्रोग्रामदरम्यान दिलेल्या माहितीस गोळा करू शकते, साठवून ठेवू शकते, व्यक्त करू शकते आणि अन्यथा वापरू शकते, ज्यात अन्य बाबींबरोबरच, यांच्याशी सीमित न राहता, नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, बँकेचे खाते आणि/किंवा डेबिट कार्ड आणि/किंवा पेटीएमचे तपशील, फोन नंबर, आणि इमेल अड्रेस (लागू असल्यास) (एकत्रितपणे "युजर डेटा") सामील असतील, ज्यात प्रोग्रामचा कारभार पाहण्यासाठी आणि रेफररच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी, आणि रेफररकडे रिवार्ड्स जमा करण्यासाठी यांचा समावेश असेल.
 • रिवार्ड रेफररकडे हस्तांतरित करण्यासाठी एमटीपीएल युजर डेटा त्याच्या बँकिंगच्या भागीदारांना देऊ शकतात. येथे वर्णन केलेल्या बाबीच्या व्यतिरिक्त, एमटीपीएलचा युजर डेटाचा वापर येथे असलेल्या त्याच्या गोपनीयता धोरणाच्या अनुषंगाने असेल.

दायित्त्व:#

प्रोग्राममध्ये सहभागी होत, रेफरर स्वीकृती देतो की:

 • या अटींशी, एमटीपीएलच्या निर्णयांशी आणि एमटीपीएलच्या गोपनीयता धोरणाशी बांधील रहा;
 • रेफररच्या या प्रोग्राममधील सहभागामुळे, त्यांच्या संबंधात किंवा अनुषंगाने होणाऱ्या कोणत्याही आणि सर्व दावे, कृती, मागण्या, हानी, नुकसान, दायित्त्वे, खर्च यांच्यापासून (यांच्यासह, यांच्याशी सीमित न राहता, मालमत्तेचे कोणतेही नुकसान, हानी, कोणत्याही व्यक्तीस(व्यक्तींना) झालेली व्यक्तिगत इजा किंवा मृत्यू आणि/किंवा अवार्डिंग, या प्रोग्राम किंवा कोणतेही रिवार्डची प्राप्ती आणि/किंवा वापर किंवा गैरवापर) एमटीपीएल, त्याचे संबंधित कर्मचारी, संचालक, अधिकारी, अनुज्ञप्तिधारक, अनुज्ञप्तिदाता, भागधारक, मुखत्यार आणि एजंट्स यांच्यासह, त्याच्या संलग्न कंपन्या यांच्याशी सीमित न राहता, त्यांच्या संबंधित जाहिरात आणि प्रचाराच्या संस्था आणि कोणतीही व्यक्ती किंवा संस्था, जी या प्रोग्रामच्या उत्पादनाशी, कार्याशी किंवा प्रशासनाशी (एकत्रितपणे "रीलीज्ड पार्टीज") जुडलेली असेल, त्यांचा बचाव करेन, क्षतिपूर्ती करेन आणि नुकसानहीन मानेन.
 • एमटीपीएल कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आनुषंगिक, विशेष, परिणामरूप, किंवा अनुकरणीय हानीसाठी, यांच्यासह, पण यांच्यासह सीमित न राहता, फायद्याच्या, प्रतिष्ठेच्या, वापराच्या, डेटाच्या नुकसानाच्या भरपाईसाठी किंवा अन्य अमूर्त नुकसानासाठी (जरी एमटीपीएलला अशा नुकसान भरपाईच्या शक्यतेबद्दल सल्ला देण्यात आलेला असला तरी देखील) जबाबदार नसेल, जे खालील बाबींच्या परिणामास्तव घडलेले असू शकते: (i) या प्रोग्रामचा वापर त्याच्या वापराची असमर्थता; (ii) याच्याकडे अनधिकृत एक्सेस किंवा तुमच्या प्रसारणात किंवा डेटामध्ये बदल; (iv) या प्रोग्रामवर किंवा याच्याद्वारा कोणत्याही त्रयस्थ पक्षाचे विधान किंवा कृती; किंवा (v) या प्रोग्रामशी संबंधित अन्य कोणतीही बाब.
 • हा प्रोग्राम तुमच्या स्वतःच्या जोखमीवर वापरा.

लबाडीचे किंवा संशयास्पद वर्तन:#

 • जर एमटीपीएलला आढळले की असा रेफरर ठकवणुकीद्वारे, हॅक करत, फसवणुकीद्वारे, द्वेषपूर्ण क्रियेद्वारे किंवा अन्य कोणत्याही अनुचित प्रचलनाद्वारे किंवा प्लॅटफॉर्मच्या अटी आणि शर्तींच्या उल्लंघनाद्वारा या प्रोग्रामच्या निष्पक्षपणाला, एकात्मतेला आणि कायदेशीर कार्याला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे किंवा एमटीपीएल आपल्या विवेकपूर्ण निर्णयात असे मानत असेल की रिवार्डस दिल्याने एमटीपीएलवर, त्याच्या अनुषंगिक कंपनी, संलग्न कंपन्या किंवा त्याचे संबंधित अधिकार, संचालक, कर्मचारी, प्रतिनिधी आणि एजंट यांच्यावर संभाव्य दायित्त्व लागू होत असेल, तर एमटीपीएल आपल्या स्वविवेकात एखाद्या रेफररला या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यापासून किंवा रिवार्ड्स मिळण्यापासून प्रतिबंधित करू शकते.
 • रेफरर्स या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी किंवा एक रिवार्ड मिळवण्यासाठी अनेक किंवा बनावट इमेल अड्रेस किंवा खात्यासह प्रवेश करू शकत नाही, कल्पित ओळखी कोणत्याही सिस्टीमचा, बोट किंवा अन्य कोणतेही उपकरणाचा वापर किंवा हिकमत करू शकत नाहीत.
 • एमटीपीएलला असे आढळले की एखादा रेफरर प्रवेशाच्या प्रक्रियेशी किंवा या प्रोग्रामच्या कार्याशी किंवा प्लॅटफॉर्मशी छेडछाड करत असेल किंवा कोणत्याही मार्गे या अटींचे उल्लंघन करत असेल, तर अशा रेफररला अपात्र ठरवण्याचा आणि/किंवा कोणतेही रिवार्ड(स) रद्द करण्याचा एमटीपीएल अधिकार राखते.

संचालन करणारा कायदा:#

हा प्रोग्राम भारताच्या कायद्याच्या अनुषंगाने संचालित होईल.